यवतमाळ- दि. 15 | माळी समाज मिशन ची बैठक यवतमाळ येथे नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रला माळी मिशन चे सक्रिय सदस्य मा.अरविंदजी आकोलकर ,नाना भाऊ आमले प्रदेश प्रवक्ता सावता परिषद , ॲड.श्रीकांत जी नागरिकर प्रदेश अध्यक्ष माळी बहूद्देशीय संस्था, निलेशजी नागापुरे , बंडुभाऊ कथिलकर, श्रीधरजी देशमुख, अजयजी राऊत, गणेशराव मानकर माळी उपस्थित होते. त्याप्रसंगी नानाभाऊ आमले यानी आपल्या व्याख्यानातून "माळी समाज मिशन 2024" बाबत माळी समाज बांधवाना माहिती दिली व समाजाला आव्हान करुन टेलीग्राम ॲप डाऊनलोड करुन घेतले व माळी समाज मिशन 2024 व माळी समाज जोड़ो मिशन अमरावती लोकाना जॉईन करण्यास सांगितले . विदर्भातील नागपुर, वर्धा, चंदपुर ,भंडारा, गोंदिया टेलीग्राम गुप लवकरच चालु करण्याचे आव्हान नानाभाऊ आमले यांनी याप्रसंगी माळी समाज बांधवाना केले. माळी समाज मिशन सोबत जुडावे असे आव्हान करण्यात आले.
माळी समाज मिशन ची बैठक यवतमाळ येथे संपन्न
Pravin
0
Tags
आपला जिल्हा
Post a Comment