संत सावता दूध उत्पादक सोसायटी तर्फे बोनस वाटप

पतोंडा-ता. चाळीसगाव(भगवान रोकडे)- दि. 15 | येथील श्री संत सावता माळी दूध उत्पादक संस्थे मार्फत दि. १५ नोव्हेंबर २०२१ रविवार रोजी सकाळी नऊ वाजता शिव दत्त मंदिरात बोनस वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेनपडू निंबा पाटिल तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे संचालक प्रमोद पाटील, तालुका अधिकारी संजय पाटील समता परिषदेचे तालुकाध्यक्ष कैलस जाधव व माजी सरपंच आबा पहिलवान उपस्थित होते. यावेळेस एकूण एकशे चौसष्ट दूध उत्पादक शेतकऱ्यांना साठ पैसा प्रमाणे बोनस वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे चेअरमन विलास भगवान माळी, व्हाय. चेअरमन अनिल बाबुराव उपळकर संचालक युवराज झगडे, बबनराव देशमुख, संतोष देशमुख विजय माळी, राजेंद्र पाटील, दत्तात्रय माळी, सुनिल चौधरी, रमेश महाजन, राजेंद्र माळी, विजय अहिरे, मनोज माळी सर, सौ. विठाबाई दत्तात्रय देशमुख, सौ. लिलाबाई गोविंदा माळी, संस्थेचे सचिव दत्तात्रय देशमुख व सर्व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे कर्मचारी मापाडी संजय सावळकर, समाधान बोरसे यांनी परीश्रम घेतले सुत्रसंचालन भगवान रोकडे तर आभार देविदास माळी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post