माळकरंजा येथे संविधान दिन साजरा

माळकरंजा, कळंब, ता 27 | तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक श्री संतोष भोजने यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांकडून संविधान उद्देशिकेचे वाचन करून घेतले. याप्रसंगी सहशिक्षक श्री हनुमंत घाडगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान निर्मिती करण्यासाठी घ्याव्या लागलेल्या अभ्यासाची आणि कष्टाची सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांकडून चित्रकला रांगोळी व भाषण स्पर्धा मधून संविधानाबद्दल च्या आदर व्यक्त करणाऱ्या बाबी करून घेण्यात आल्या. कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती भारती सूर्यवंशी यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post