पेठ- दि १५ ऑक्टोबर | ना . छगनरावजी भुजबळ हे बहुआयामी व्यक्तीमत्व असुन अत्यंत प्रतिकुल परिस्थिती वर मात करतांना झुंजार बाणा कधीही सोडला नसलेल्या जाणता राजाचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने जनतेच्या समस्याची नस ओळखून सोडविणारा योद्धा असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब कर्डक यांनी पेठ येथील कार्यक्रमात करण्यात आले .
राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण सोहळ्याची सुरवात पेठ येथे करण्यात आली. महात्मा फुले समता परिषदेचे नाशिक जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष संतोष डोमे यांनी आयोजीत केलेल्या ना. भुजबळ अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त आयोजीत कार्यक्रमात करण्यात आले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामदास गवळी यांनी केले . कार्यक्रमास पं. स. सभापती विलास अलबाड , माजी नगराध्यक्ष मनोज घोंगे, नाशिक जिल्हा मध्य. सह. बॅकेचे संचालक नामदेव हलकंदर, माजी सरपंच पुंडलिक महाले, मोहन कामडी, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विशाल जाधव, कांतीलाल राऊत, भागवत पाटील, आदी सह आंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य सेवीका, उपस्थित होत्या. यावेळी आरोग्य सेविका, आशा वर्कर यांना करोना काळात केलेल्या सेवेबद्दल सन्मान पत्र तसेच साडी वाटप करण्यात आले.
Post a Comment