श्रीरामपुरात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक लवकरच -नगराध्यक्षा आदिक

रांजणखोल (महेश दारुंटे) आपल्या भारत देशामध्ये अनेक महान अशा महिलांनी जन्म घेतला. ज्यांनी आपल्या महान कार्याने आपले नाव इतिहासाच्या पानावर कोरले आणि समाजासाठी एक नवा आदर्श निर्माण केला त्यांचे कार्य विसरणे अशक्य आहे ज्यांनी समाजाला एक नवी दिशा दिली जुन्या चालीरिती झुगारून युवावर्गाला एक नवी दिशा दिली. सावित्रीबाई फुले या थोर समाजसेवक समाज सुधारक व महान शिक्षण प्रसारक होत्या ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. समाजाचा विरोध डावलून समाजाकडे लक्ष न देता स्त्री शिक्षणाचा पाया फुले दांपत्यानी भिडेवाडा येथे रचला. सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य पाहता त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन श्रीरामपुरात लवकरच सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारू त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने प्रस्तावही पाठवलेला आहे तो लवकरच मंजूर होईल असे आश्वासन श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी दिले.

संत सावता माळी युवक संघटना अहमदनगर, श्रीरामपूर व राहुरी यांच्या वतीने नगराध्यक्ष आदिक यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड सुनील गुलदगड, राज्य सचिव प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, मुकुंद काळे, उत्तरजिल्हाध्यक्ष मनोज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. या निवेदनावर दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, श्रीरामपूर अध्यक्ष महेश दारुंटे, आरोग्य मित्र सुभाषराव गायकवाड, पत्रकार भाऊसाहेब जाधव, सागर सोनवणे, अमोल पुजारी, संदीप विधाटे, बिपिन म्हसे, महेश सोनवणे, अक्षय अभंग, कैलास दारूंटे, ज्ञानेश्वर ताबे, अमोल सिन्नरकर, गणेश ढंगारे, मयुर शिदे, प्रशातं विधाटे आदींचे नावे व सह्या आहेत.

संत सावता माळी युवक संघटनेच्या वतीने श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष करण ससाने यांची सावित्रीबाई फुले स्मारक बसवण्यासाठी भेट घेतली व मागणी करण्यात आली. यावेळी करण ससाणे यांनी सर्वातपरी मदत करण्याचे आश्वासन संघटनेला दिले.

Post a Comment

Previous Post Next Post