डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते काळाराम मंदिरात अभिषेक

नाशिक,दि.9 ऑक्टोबर | महाविकास आघाडी सरकारच्या वतीने घटस्थापनेच्या मुर्हुतावर मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यापार्श्वभूमीवर या निर्णयाचे स्वागत करत मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी नाशिक शहरातील काळाराम मंदिरात अभिषेक व पूजन करत दर्शन घेतले. त्याचबरोबर त्यांनी पंचवटीतील गंगाघाट येथील सप्तश्रृंगी मातेच्या मंदिरातही आरती करत दर्शन घेतले. यावेळी कोरोनाचे संकट लवकरच दूर होऊदे असे साकडे त्यांनी घातले.

राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, पंचवटी विभाग अध्यक्ष शंकर मोकळ, महेश भामरे, सचिन कळासरे, संतोष जगताप, आर्यन मोकळ, साहिल मोकळ, सरिता पगारे, प्रफुल्ल पाटील, किरण पानकर , रामेश्वर साबळे, गणेश गरगटे आदी पंचवटीतील पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post