ओबीसी आरक्षण डेटा जमा करणे राज्य आयोगाची जबाबदारी :- प्रा.हरी नरके

मुंबई- ०३ सप्टेंबर | ओबीसी राजकीय आरक्षण डेटा जमवण्याचे काम राज्य मागास वर्ग आयोगानेच करावे,यावर आज सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले.डेटा जमवण्याचे काम रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान या खाजगी संस्थेला द्यावे हा देवेंद्र फडणवीस यांचा डाव उधळला गेला. ज्या संस्थेचे अध्यक्ष खुद्द फडणवीस आहेत, नी ज्या संस्थेने जमवलेला मराठा आरक्षणाचा डेटा सदोष असल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयाने ठेवला होता, त्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाले होते त्याच संस्थेला हे काम द्यायला ओबीसीन्चा विरोध होता,आहे,राहील.

आयोगामार्फत हे काम 4 महिन्यात शक्य आहे. फक्त निधी,राजकीय इच्छाशक्ती नी शासकीय यंत्रणा दिली तर हे काम आयोगामार्फत ताबडतोब होऊ शकते.असे मत ओबीसी अभ्यासक प्रा हरी नरके यांनी व्यक्त केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post