नाशिक, महाराष्ट्र - १५ ऑगस्ट | भुजबळ फॉर्म नाशिक येथून क्रांतीसूर्य न्यूज वेब पोर्टलचा(www.krantisuryanews.in) आदरणीय ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते उदघाटन आणि शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना क्रांतीसूर्य न्यूज टीम यांनी एक चांगला उपक्रम सुरू केला आहे, फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे न्यूज पोर्टल क्रांतिसूर्य न्यूज अँड व्ह्यूज. बातम्या सुद्धा आणि लोकांचे विचार, सामाजिक उपक्रम इत्यादी जाणून घेऊन ते लोकांपर्यंत पोहचण्यासाठी एक चांगल काम आहे, म्हणजेच समतेचे काम, म्हणजे महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू, आंबेडकरांचे काम, या मीडिया च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम यातून होत आहे, कारण आज या विचारधारांना मानणारे करोडो लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहचणे अशक्य होते, मीडिया हे एकमेव अस माध्यम आहे ज्याच्याद्वारे आपण घराघरात पोहचू शकतो. क्रांतिसूर्य न्यूज टीमने एक अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे, आपण सर्वांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या पाहिजे ,आशीर्वाद दिले पाहिजे, मी माझ्या वतीने पूर्ण शुभेच्छा त्यांना देतो आणि त्यांच्या उपक्रमामध्ये ते यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. असे मत त्यांनी व्यक्त केले"[embed]https://youtu.be/bPQpjWedOWA[/embed]
यावेळी अ. भा. म. फुले समता परिषद विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप अण्णा खैरे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष समाधान जेजुरकर, स्वीय सहाय्यक महेश अण्णा पैठणकर क्रांतीसूर्य न्यूज चे कार्यकरी संपादक अनिल नळे, मुख्य संपादक प्रविण बोचरे, सहसंपादक प्रसाद पवार, अरुण थोरात, संतोष पुंड हे उपस्थित होते.
Post a Comment