ओबीसी आरक्षण आणि संघटन यासाठी बैठक संपन्न

नेर, धुळे- दि.१० जुलै - ओबीसी आरक्षणावर जनजागृती घडवून आणण्यासाठी धुळे जिल्ह्यातील नेर येथे संत सावता महाराज मंदिरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक संपन्न झाली. या बैठकीत धुळे व साक्री तालुक्यात ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी दि १५ जुलै २०२१ रोजी नेर येर्गे ओबीसी आरक्षण पे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला समता परिषद उत्तर महाराष्ट्र निरीक्षक नितीन शेलार, संघटक अनिलजी नळे, धुळे जिल्हा अध्यक्ष राजेश बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे नेर येथील पंकज वाघ, संजय सैदाने, तुषार जाधव, आबा पगारे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post